fbpx

पारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनी मानले पंकजा मुंडेंचे आभार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शिक्षकांच्या बदल्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजला होता. त्यावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा निर्णय घेतल्यामुळे अपंग, गंभीर आजार असलेले, पती-पत्नी एकत्रिकरण यासाठी फायदा झाला आहे.

यापूर्वी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक १५-१५ वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा झाला आहे.

यासाठीच जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आँनलाइन आणि पारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनाच्यां बदल्यामध्ये होणारा अन्याय थांबला असल्याने राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी भेट घेऊन पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.