मास्तर भिडले, शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिक्षकांची तुंबळ हाणामारी

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात आज नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे. मात्र निवडीपूर्वीचं या निवडणुकीच्या कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले आहे. तर या वादात धक्काबुकी झाली असून बँकेच्या संचालकाला दमदाटी देखील करण्यात आली आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड आज होणार आहे. या निवडीपूर्वी बँकेचे संचालक हे सभागृह जात असतानाच त्यांना अनेक सदस्यांनी त्यांना अडवले. काही जणांनी संचालकांनी आतमध्ये जाऊ नये अशी भूमिका घेतली. मात्र दुसऱ्या गटाकडून संचालकांना आत मध्ये नेण्यासाठी मोठी धडपड सुरू होती. त्यातच वाद तीव्र होत गेला आणि रस्त्यामध्ये शिक्षकांची खडाजंगी झाली. तर शिक्षकच रस्त्यावर भिडल्यामुळे एकच गोंधळ उडाला.