क्रीडा प्रबोधनीसाठी शिक्षकांकडून ६ लाखांची मदत

जालना : जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ५ लाख ८१ हजार रुपयांची आर्थिक मदत क्रीडा प्रबोधनीसाठी धनादेश शुक्रवारी जालना जिल्हा परिषद विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या मदतीच्या निधीतून क्रीडा प्रबोधनीची अनेक कामे मार्गी लागणार आहेत.

जालना येथे स्थापन केलेल्या क्रीडा प्रबोधनीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्ह्यातील नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जिल्ह्यातून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये निपून असलेल्यांना शालेय शिक्षणासोबतच क्रीडा शिक्षण दिल्या जाते. दरम्यान जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रत्येकी १ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचे आवाहन अरोरा यांनी केले होते. त्या नुसार जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ५ लाख ८१ हजार एवढा निधी जमा करण्यात आला. हा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. क्रीडा प्रबोधनीच्या संकलीत केलेल्या निधीसाठी जाफराबादचे गटशिक्षणाधिकारी जिनेंद्र काळेंसह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.

या निधीमधून शालेय शिक्षण घेणाऱ्या तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये तरबेज असणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून विविध विषयांतील क्रीडा प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. आणी या माध्यमातून जालना येथील क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणारे विद्यार्थी पुढील क्रीडा शिक्षण, प्रशिक्षण देण्यासाठी लागणारे साहित्य, प्रशिक्षण घेतलेले क्रीडा शिक्षक, कोच देखील या वेळी लागणार आहेत. तर हे सर्व क्रीडा प्रबोधनी काम करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या