…तर राज्यभरातून ५०० शिक्षक सामुदायिक आत्मदहन करणार

निलंगा/प्रदीप मुरमे : १९ सप्टेंबर २०१६ चा जाचक शासन निर्णय रद्द करुन २० टक्के अनुदानप्राप्त १६२८ शाळा व २४५२ वर्गतुकड्यांना नियमानुसार १०० टक्के वेतन अनुदान मिळावे या न्याय मागणीसाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर मागील तब्बल ८० दिवसापासून शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरु आहे. परंतु शासनाकडून आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही.दरम्यान शिवसेनापातळीवरुन उद्योग मंञी तथा शिवसेना नेते ना.सुभाष देसाईजी यांनी आमच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली असल्याचे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.पी.पाटील यांनी भ्रमणध्वनीवरुन ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.

मंञी देसाई यांनी आमच्या शिष्टमंडळाची शिवसेनेचे सर्वेसर्वा उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या समवेत शनिवारी शिवसेना भवनमध्ये भेट घडवून आणली. आपली मागणी न्याय असून मी याबाबत मुख्यमंञी फडणवीस यांना बोलतो. तसेच आगामी मंञीमंडळाच्या बैठकीत आपला विषय मांडून शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी मी आपल्या पाठीशी आहे असा शब्द ठाकरे साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला दिल्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचे के.पी.पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. या शिष्टमंडळात अल्पसंख्याक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर,महिला आघाडी प्रमुख नेहाताई गवळी,शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हाञे आदींचा समावेश होता.शिक्षणमंञी विनोद तावडे हे वेळोवेळी अनुदानाचा शब्द देवूनही ते आपला शब्द पाळत नाहीत असा आमचा आजतागायतचा अनुभव आहे.त्यामुळे आता पोकळ आश्वासन नको तर याबाबत मंञीमंडळाच्या बैठकीत निर्णय करावा तेव्हाच आम्ही आझाद मैदान सोडून आमचे आंदोलन मागे घेवू या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत.

Loading...

उध्दवजी ठाकरे साहेब सांगूनही शिक्षणमंञ्यांनी आमची प्रचलित नियमानुसार अनुदानाची मागणी मान्य न केल्यास माञ राज्यातील स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे ५०० शिक्षक शेवटचा हत्यार म्हणून आत्मदहनाचा टोकाचा मार्ग अवलंबण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत असा इशारा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पाटील यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिला.रविवारचा आंदोलनाचा आज आमाचा ८१ वा दिवस असून शेकडो शिक्षक उपस्थित असल्याचे पाटील यांनी सांगितले. खंडेराव जगदाळे मागील तीन वर्षापासून अनवाणी पायाने फिरतात, कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे अनुदानाच्या मागणीसाठी आत्मक्लेश म्हणून मागील तीन वर्षापासून पायी चप्पल न घालता अनवाणी पायाने राज्यभर फिरत संघटनेचे काम करतात !

स्वाभिमानी शिक्षक संघटनेबरोबरच कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीनेही याबाबत मागील अनेक वर्षापासून वेळोवेळी आंदोलने करुन सरकारकडे अत्यंत आक्रमकपणे आपली बाजू लावून धरली आहे.सरकारला १०० टक्के अनुदान देण्यासाठी भाग पाडू याबाबत कृती समितीचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर,उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे,मुंबई विभागाध्यक्ष प्रशांत रेडीज यांच्यासह शेकडो पदाधिकारी व हजारो शिक्षक ठाम आहेत.कृती समितीच्यावतीने नुकतच पार पडलेल्या अधिवेशना दरम्यान कृती समितीच्यावतीने हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत मुंबई येथील आझाद मैदानावर व्यापक आंदोलन करण्यात आले होते.

कृती समिती व स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या या संयुक्त आंदोलनाची सरकारने दखल घेतली. त्यामुळे ना.विनोद तावडे यांनी याबाबत सभागृहात निवेदन करुन पुढील टप्पा येत्या एप्रिल पासून देवू अशी घोषणा केली.परंतु या घोषणेणे शिक्षकांचे समाधान झाले नसल्यामुळे संघटना १०० टक्के वेतन अनुदानाच्या मागणीवर आजही ठाम आहेत.संघटनांचा वाढता दबाब व राज्यभरातील शिक्षकांचा प्रचंड रोष विचारात घेवून ना.तावडे यांनी नुकतच शिक्षक संघटनेच्या पदाधिका-यांना तुमचा प्रश्न लवकरच मंञीमंडळाच्या बैठकीत निकाली काढू असा शब्द दिल्याने राज्यभरातील १९२४७ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आगामी मंञीमंडाळाच्या बैठकीचे वेध लागले आहेत, ना.तावडे या बैठकीत नेमकी काय भुमिका घेतात याकडे शिक्षक संघटना व शिक्षकांना कमालीचे औत्सुक्य लागून राहिले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का