fbpx

शिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण

टीम महाराष्ट्र देशा- जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेळगावातील शाळेत बालदिनानिमित्त कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पोवाड्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा एका विद्यार्थ्याने दिल्या. त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकार व कानडी संघटना विविध कारणांनी मराठी भाषिकांना त्रास देत असतानाच, बालदिनाच्या कार्यक्रमावेळी अशी घटना घडल्याने मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या संतापजनक प्रकाराची माहिती युवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी शाळेत जाऊन संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकाला चांगलंच झापलं.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी : मुंडे

छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक करा…

चार वर्षात विकास कामे का केली नाहीत ? असा सवाल करत भाजप आमदाराला चोप