वाण नाही पण गुण लागला! पाकिस्तानात शिक्षकांना टीशर्ट-जीन्स घालण्यास बंदी

imran khan

कराची –  अफगाणिस्तानातील नव्या सरकारने महिलांच्या ड्रेसकोड बाबत घोषणा केल्यानंतर आता पाकिस्तानमध्येही  शिक्षकांच्या पोशाखावरच अनेक अटी आणि निर्बंध टाकण्यात आले आहेत. फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशनने (FDE) पाकिस्तानमधील महिला शिक्षकांनी जीन्स आणि घट्ट कपडे घालू नये अशी अधिसूचना जारी केली आहे. यासोबत, याच अधिसूचनेत पुरुष शिक्षकांना देखील जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

देशातील शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रायार्यांना याबाबतचं पत्र पाठवण्यात आलं आहे. यात शाळा आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यपकांना आपल्या शिक्षण संस्थेतील शिक्षक ड्रेसकोड प्रोटोकॉलचं पालन करतील याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ड्रेस कोडसोबतच केस कापलेले असणं, क्लीन शेव, नखं कापलेली असणं इत्यादी सूचनांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये व ड्युटीवर असताना या नियमांचं शिक्षकांना पालन करावं लागणार आहे.

शाळांमध्ये शिकवताना किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित बैठकींना हजर असतानाही अशाच प्रकारचा ड्रेस कोड सक्तीचा करण्यात आला आहे. पुरुष शिक्षक जर कुर्ता आणि पायजमा परिधान करून शाळेत आले तर त्यांना त्यावर लांब कोट परिधान करावा लागणार आहे. शिक्षिकेची इच्छा असल्यास त्यांनी बुरखा परिधान करावा असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या