fbpx

शिक्षिकेला विद्यार्थ्यांशी प्रेमप्रकरण पडलं महागात, गमवावी लागली नौकरी

वेबटीम – “प्यार मे और जंग मे सब जायज हे” हे वाक्य आपल्याकडे अनेक वेळा आयकायला मिळत. प्रेम हे कोणावरही होऊ शकत. असच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रेम जुळण्याची प्रकरणं काही नवी नाहीत. पण आपल्याच विद्यार्थ्यांसोबतच प्रेमप्रकरण एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडलं आहे.

लंडनच्या ब्रॅडफोर्ड येथील टोंग हायस्कूलमधील  ३६ वर्षीय नजमा या शिक्षिकेचं तिच्याच शाळेतील १८ वर्षांच्या विद्यार्थ्याशी प्रेमसंबंध होते. तब्बल नऊ महिने त्यांचं हे प्रेमप्रकरण सुरू होतं. ही शिक्षिका त्या विद्यार्थ्यासोबत फेसबुक तसेच इतर चॅटिंग अॅप्सवर गप्पा मारायची. अधूनमधून त्या विद्यार्थ्याला आपल्या घरी देखील बोलवायची.

हे सर्व प्रकरण बाहेर आल्यानंतर ‘नॅशनल काउन्सिल फॉर टीचिंग अँड लीडरशिप’च्या चौकशी समितिने याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला. या प्रेमप्रकरणामुळे संबंधित विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान झाल्याचंही सिद्ध झालं. त्यामुळं शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शाळेनं घेतला.त्यामुळे या शिक्षिकेला शाळेनं नोकरीतून काढून टाकलं असून आता शिक्षक म्हणून तिच्यावर आजन्म बंदी घातली आहे.