प्राथमिक शिक्षकांचे पगार 2 दिवसांमध्ये होतील – चारुशीला चौधरी

Teacher salaries will take place within 2 days

अहमदनगर  : शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने १२ जानेवारी पासून शालार्थ प्रणाली बंद पडली होती.जानेवारी २०१८ चे पगार अखेर ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्याचे आदेश व वेतन ही ऑफलाईन पद्धतीने देण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव चारुशीला चौधरी तसेच राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी पारीत केले होते.

त्यानंतर लगेचच अहमदनगर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले तसेच वेतन पथक अधिक्षक राजमोहन शर्मा यांनी माध्यमिक शिक्षकांचे पगार येत्या २ दिवसात बँकेत जमा होतील, असे सांगितल्याची माहिती शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांनी दिली.वेतन पथक अधिक्षक कार्यालय,अहदमनगर यांच्याकडे १० जानेवारी पर्यंत ज्या शाळांनी ऑनलाईन पगार बिले सादर केली होती. तसेच २ फेब्रुवारी पर्यंत ज्या शाळांनी ऑफलाईन पगार बिले वेतन पथक कार्यालयाला सादर केली होतील अशा ५५० माध्यमिक शाळा व पाच रात्र शाळा यांच्या पगार बिलाचा चेक ए.डी.सी.सी.बँक अहमदनगर येथे बुधवारी जमा केला आहे.अशा ५५५ शाळांवर काम करणा-या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार येत्या दोन दिवसात बँकेत जमा होतील अशी माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे पगार तातडीने मिळावेत या कामी माध्यमिक शिक्षकेतर संघटना यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.ज्या माध्यमिक शाळांनी वेतन पथक अधिक्षक कार्यालय माध्यमिक,अहमदनगर यांच्याकडे अद्याप जमा केले नाहीत.अशा शाळांनी तातडीने जानेवारी महिलन्यांचे पगार बिले सादर केले नाहीत,त्यांनी जानेवारीच्या पगार बिलाला डिसेंबर महिन्याची झेरॉक्स प्रत जोडावी म्हणजे पगार लवकर आदा केले जातील, अशी माहिती अधिक्षक राजमोहन शर्मा यांनी शिक्षक भारती संघटेनेच्या पदाधिका-यांना दिली.