fbpx

नव्या पद्धतीचे संख्यावाचन हे अत्यंत खेदजनक, शिक्षक आमदाराची टीका

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशासनाने बालभारतीकडून दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात फेरबदल केले आहेत. मात्र, संख्यावाचनात जे बदल सुचवले गेले आहेत, ते अत्यंत खेदजनक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मांडले आहे.

नव्या पद्धतीच्या संख्यावाचनाने विद्यार्थांना गणित विषय समजणे सोपे होण्याऐवजी जे बदल केले आहेत ते शिकवताना आणि मुलांना उच्चारताना कठीण जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढवणारे बदल गणिताच्या पुस्तकात केल्यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी सभागृहात केली जाईल, असे विक्रम काळे यांनी सांगितले.