विचित्र अपघातात शिक्षक जागीच ठार

accident

कुर्डूवाडी-  कुर्डूवाडी बायपासला बार्शी रोडवर झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात एक शिक्षक आणि
जागीच मरण पावला असून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.याबाबत फिर्यादी अमरसिंह भोरे यांनी दिलेल्या माहिती नुसार माढा तालुक्यातील भांबुरे वस्ती येथील जि.प शाळेवर कार्यरत असणारे राहूल श्रीधर भोरे (वय ४१, राहणार भोसरे) हे जागीच मरण पावले.मंगळवारी शाळा सुटल्यानंतर भोरे हे आपल्या दुचाकी (एम एच १३ एन.३६९८) वरून घराकडे निघाले होते, कुर्डूवाडी बायपासला रेल्वे पुलाच्या उतारावर टेंभूर्णी कडे जाणाऱ्या ट्रकने ( एम एच २५ बी ७६५५) जोरात धडक दिली. दुचाकी व ट्रक पुढे असलेल्या पिकअप (एम एच ०९ सीए १५६४) ला धडकली तर पिकअप पुढे असलेल्या एसटी (एम एच २० बीएल ००४९) ला धडकली अशा विचित्र चार वाहनांच्या या अपघातात शिक्षक भोरे हे जागीच ठार झाले तर दुचाकी वर मागे बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे.भोरे हे मराठा सेवा संघाचे कार्यकर्ता होते, त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, बहिण, दोन मुले असा परिवार आहे.Loading…


Loading…

Loading...