चहा घोटाळा: परवडतं तेच देतो! तुम्ही जे पिता ते आम्हाला परवडतं नाही मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांनी मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण चाहपाण्यावर येवढा खर्च केला नव्हता. या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. आम्हाला जे परवडतं तेच आम्ही देतो. हे सांगून आम्ही चहा देतो. असं सांगत तुम्ही जे पिता ते आम्हाला परवडत नाही असं सांगत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची संस्कृती वेगळी असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप अधिवेशनात करण्यात आला होता. त्यावर  भाजपच्या महामेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. पवारसाहेब साहेब तुम्ही उगाच चहावाल्यांच्या नादी लागू नका. जरा २०१४ आठवा की चहावाल्यांनी तुमची काय हालत केली. उगाच नादी लागू नका नाहीतर तुमची काय हालत होईल याचा विचार केला. असे फडणवीस म्हणाले.

भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.