शिवसेनेकडून प्रेरणा घेऊनच टीडीपी एनडीएतून बाहेर – संजय राऊत

sanjay-raut-

मुंबई: शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन टीडीपी एनडीएतून बाहेर पडली. असे शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केले. त्यांनी राज्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला आहे. आता टीडीपी सोनिया गांधींच्या डिनरला जाणार आहे. असे देखील राऊत म्हणाले.

तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली. अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश चंद्राबाबूंनी दिले आहेत. मात्र टीडीपी एनडीएतून बाहेर पडण्याच्या प्रेरणेचं मूळ महाराष्ट्रात, शिवसेनेकडे आहे. असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत ?

शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन टीडीपी एनडीएतून बाहेर पडली. चंद्राबाबूंनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते महिनाभरापासून पायाभरणी करत होते. जी गोष्ट आम्हाला पटत नाही, त्याविरोधात आवाज उठवायचा, हा धडा शिवसेनेने घालून दिला आहे. जेव्हा आम्ही त्याबाबत बोलत होतो, तेव्हा चंद्राबाबू आमच्यावर टीका करत होते. पण आता त्यांनी आमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, सरकारविरोधात आवाज उठवला. त्यांच्या राज्यासाठी, त्यांच्या पक्षासाठी त्यांनी निर्णय घेतला. त्यांना जे योग्य वाटलं, ते त्यांनी केलं. मात्र त्यांच्या प्रेरणेचं मूळ महाराष्ट्रात, शिवसेनेकडे आहे हे चंद्राबाबूंनाही माहित आहे.

Loading...