fbpx

चंद्राबाबूंविरोधातील वॉरंट हे मोदी-शहांचे षडयंत्र :टीडीपी

2-chandra-babu-modi narendra

टीम महाराष्ट्र देशा- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात धर्माबाद इथल्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. मात्र आता या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावणे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांच्याविरोधात रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप लंका दिनाकर यांनी केला आहे. दिनाकर हे तेलगू देसम पक्षाचे प्रवक्ते आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?
चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशमध्ये विरोधात असतांना 2010 मध्ये त्यांनी बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून पुण्यातील तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर त्यांनी जामीन नाकारला होता. पण नंतर नायडूंची सूटका करण्यात आली होती. नायडू यांच्यावर या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धोकादायक शस्त्राद्वारे इजा पोहचवणे, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता धर्माबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. गजभिये यांनी या प्रकरणात नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

भाजपने आमची अक्षरश: फसवणूक केली !