fbpx

वायएसआर काँग्रेस मोदी सरकार विरोधात आणणार अविश्वास ठराव

pm-narendra-modi

टीम महाराष्ट्र देशा : नरेन्द्र मोदी सरकारविरोधात आज लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून एनडीए सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.

आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळाला नाही म्हणून नाराज असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांनी भारतीय जनता पार्टीसोबत (एनडीए) संबंध तोडले आहेत.
दरम्यान, वायएसआर काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, ज्याला टीडीपीही पाठिंबा देणार आहे.

वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी अविश्वास ठरावाबाबत पत्र लिहून अनेक विरोधी पक्षांकडे पाठींब्याची मागणी केली आहे. तर वायएसआरचे खासदार वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा सचिवांना नोटीस देऊन, आजच्या कार्यसूचीत अविश्वास प्रस्ताव सामील करण्याची मागणी केली.