टीसीएसने रचला नवा इतिहास

शेअर बाजार

वेब टीम– देशातली दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टीसीएसने आज सोमवारी बाजार उघडताच नवा इतिहास रचला. 100 बिलियन बाजार भांडवल असलेली टीसीएस ही भारतातील एकमेव कंपनी बनली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळी 9.49 वाजता कंपनीचे बाजार मूल्य 6,62,726.36 कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचले.

सोमवारी टीसीएसचे शेअर्स 4.41 टक्क्यांपर्यंत गेल्याने त्यांनी 140 अंकांपर्यंत उसळी घेतली. शुक्रवारी बाजार बंद होते वेळी टीसीएसचे शेअर 3,402 स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर आज सोमवारी टीसीएसच्या शेअर्स 3,424 पर्यंत अंकांवर पोहोचले. टीसीएसचे बाजार भांडवल इतर आयटी इंडेक्स कंपन्यांच्या तुलनेत 52 टक्क्यांहून अधिक आहे.Loading…
Loading...