fbpx

TAXI- टॅक्सीमध्ये जी पी एस पॅनिक संयत्रं बसविणं बंधनकारक

टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा लक्षात घेत महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं सुचवलेल्या शिफारशींचा समावेश नवीन टॅक्सी धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आला आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी रस्ते परिवहन मंत्रालयाला या शिफारशी सुचवल्या आहेत. टॅक्सी प्रवासादरम्यान काही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्वे सुनिश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार टॅक्सीमध्ये जी पी एस पॅनिक संयत्रं बसविणं बंधनकारक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. टॅक्सीमध्ये वाहनचालकाच्या सचित्र ओळखपत्रासह वाहनांचा नोंदणी क्रमांक ठळकपणे नमूद केलेला असावा, अशा शिफारसी करण्यात आल्या आहेत.