पेट्रोल-डिझेलवर कर लावून भाजपसरकार तुंबडया भरतंय- जयंत पाटील

jayant patil and petrol pump

मुंबई  – केंद्रसरकार आणि राज्यसरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून आपल्या तुंबडया भरत आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला लुटण्याचे काम भाजप दोन्ही ठिकाणी करते आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Loading...

पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करामुळे महागाई वाढली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात महाग पेट्रोल आमच्या देशात आणि देशातील सर्वात महाग पेट्रोल आमच्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर लावण्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढले मी समजू शकतो. परंतु महाराष्ट्राचा कर, वॅट आणि केंद्रसरकारचा अबकारी कर यांची एवढी मोठयाप्रमाणात कर वाढ झालेली आणि आणि कर वाढ केली आहे त्यामुळे केंद्रसरकार आणि राज्यसरकार पेट्रोल आणि डिझेलच्या पैशातून चालवायचा प्रसंग भाजप सरकारवर आलेला आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

आपले स्वतं:चे कर कमी करण्याची संधी असतानाही राज्यसरकार कर कमी करत नाही. व्हॅल्यूअँडेड टॅक्स कमी केला तर थोडासा दिलासा महाराष्ट्रातील ग्राहकांना मिळेल. केंद्रसरकार पेट्रोलवर जी काही एक्साईज डयूटी घेत असेल तर ती कमी करावी. त्यामुळे देशभर पेट्रोल-डिझेलची परिस्थिती सुधारेल नाहीतर पाकिस्तानचं पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. अफगाणिस्तानचं, श्रीलंकेचं आणि बांग्लादेशचं पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. मग भारताने भाजपला मत देवून अशी काय घोडचूक केली असा प्रश्न सामान्य लोकं आज विचारत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.Loading…


Loading…

Loading...