कोल्हापूरच्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबवले- तावडे

नागपूर : कोल्हापूरच्या भावेश्वरी संदेश विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनीला उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचे आदेश संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कानूरबुद्रुक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका आश्विनी देवण यांनी दिली. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकाराची तातडीन दखल घेऊन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून ताबडतोब चौकशी अहवाल मागविण्यात आला.

यानंतर मुख्याध्यापिका देवण यांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

Comments
Loading...