सरपंच थाळी, पाटील थाळी…तात्याच्या ढाब्याचा नादचं खुळा

टीम  महाराष्ट्र देशा : सरपंच  थाळी, पाटील  थाळी आणि सावकार  थाळी….  या  प्रकारच्या नाव असलेल्या थाळी कदाचित  तुम्ही  कधी  ऐकल्याही नसतील. मात्र  या नावाच्या मोठं – मोठ्या थाळ्या ग्राहकांना दिल्या जातात. पुण्यातील औध – बाणेर लिंक रोड वरील ‘तात्याचा  ढाबा’  इथे या थाळ्यात ग्राहकांना देण्यात येतात. थाळीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. नेमकं कशा असतात या  थाळ्या आणि काय आहे त्याच वेगळेपण.

Loading...

सरपंच, पाटील आणि सावकार ही नाव जशी  भारदस्त आणि मोठी वाटतात, आता  त्याच्या  नावा प्रमाणेच भल्ली मोठी नॉन व्हेज  थाळी पुण्यात सुरु करण्यात आली आहे.  एकाच थाळीत जवळपास आठ  ते  दहा  जण मनोसक्त  जेवण करू  शकतील अशा आकाराच्या या थाळ्या आहेत.

मटण, चिकण, फिश, सुकी कलेजी, किमा, काळां रस्सा, थांबडा रस्सा, मटण सूप, अंडी, पापड, साजूक तुपातील इंद्रायणी राईस, डाळ खिचडी, चार प्रकारच्या भाकरी, ताक, सोल कढी आणि कोशिंबीर असा भल्ला मोठा मेनू एकाच वेळी एकाच थाळीत ग्राहकाना खायला देण्यात येतो. त्यामुळे एकाच मोठ्या थाळीत या मोठ्या नॉनव्हेज मेनूच आस्वाद घेण्यास पुणेकर मोठी पसंती दाखवत आहेत.

मटण, चिकन आणि फिश या पासून अनेक वेगेवगेळे खाद्य पदार्थ बनविले जातात. हे सर्व खाद्य पदार्थ एकाच थाळीत ग्राहकांना देता यावं त्या दृष्टीकोनातून सचिन वलके या तरुणाने या प्रकारच्या वेगळ्या नावाच्या थाळ्या तयार केल्या आहेत. सरपंच थाळी ही जगातील सर्वात मोठी नॉन व्हेज थाळी असल्याचा दावा देखील सचिन वलके यांनी केला आहे.

सरपंच, पाटील आणि सावकार यांच्या नावात जसा मोठा रुबाब आहे, तसा मोठा रुबाब ही थाळी खाताना तुम्हाला अनुभवता येणार आहे. त्यामुळे या मोठ्या आकाराच्या नॉन व्हेज थाळ्या सध्या खवये पुणेकरांन मोठी भुरळ घालत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का