उंदीर घोटाळ्यावरून विखे पाटलांची सरकारवर तुफान फटकेबाजी

मुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचा दावा खडसेंनी केला होता. हाच मुद्दा पुढे करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सरकारवर तुफान फटकेबाजी केली.

मंत्रालयातील उंदरांना मारण्यासाठीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेचा मागील आठवड्यात एकनाथ खडसे यांनी पर्दाफाश केला होता. सरकारचे ते उंदीर निर्मूलनाचे टेंडर फसले असले तरी मी आज मी सरकारसमोर एक नवे टेंडर सादर करतो. या टेंडरचा गांभीर्यांने विचार करुन ते लवकरात लवकर स्वीकृत केले पाहिजे.

सरकारला उद्देशून विखे पाटील म्हणाले, उंदरांमध्ये काही सुष्ट आहेत, काही पुष्ट आहेत, तर काही दुष्ट आहेत. काही उंदीर बेडकीसारखे फुगून मस्तवाल झाले आहेत. तर काही अगदीच कृश आहेत. काही उंदीर हे इतर मस्तवाल उंदराकडे पाहून नुकतेच जन्माला आले आहेत. तर काही उंदीर उंदरींच्या उदरातून जन्म घेऊ पाहत आहेत. अशा उंदरांचे निर्मूलन करण्यासाठीचे हे टेंडर आहे.

You might also like
Comments
Loading...