राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाची झळ पहिल्याच दिवशी जाणवली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि भाषणावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला.

दरम्यान सरकारविरोधत घोषणाबाजी करत विरोधक सभागृहाबाहेर पडले. अधिवेशनात धर्मा पाटील ,हमीभाव अशा अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधक आमने सामने आहेत.
दरम्यान सरकारनं आयोजित केलेल्या चहपानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या आयोजनावर सरकारवर हल्लाबोल केला. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही.

तर राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून फडणवीस सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. आणि विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला.

You might also like
Comments
Loading...