बॉम्बे हाऊसचे नुतनीकरण होणार !

bombay house

मुंबई : टाटा समुहाचे मुख्य कार्यालय ‘बॉम्बे हाऊस’च्या नुतनीकरणासाठी ते तात्पुरत्या स्वरुपात फोर्ट येथे हलविण्यात आले आहे. १९२४ साली बांधलेले हे ‘बॉम्बे हाऊस’ मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. तब्बल ९३ वर्षे जुन्या या वास्तूत प्रथमच नुतनीकरणाचे काम करण्यात येत आहे.

नुतणीकरणासाठी मुंबईतील प्रतिष्ठीत वास्तुविशारद ब्रिंदा सोमाया यांना देण्यात आले आहे. नुतणीकरणाच्यावेळी त्या वास्तूच्या मूळ ढाच्यात काहीच बदल न करण्याचे आदेशात रतन टाटा यांनी दिल्याचे समजते. ” बॉम्बे हाऊसमध्ये काम करणाऱ्या तब्बल ५५० कर्मचाऱ्यांना डीएन नगर येथील फोर्ट हाऊस व मुंबईतील टाटा समूहाच्या इतर कार्यालयांमध्ये पाठविण्यात आले आहे.