भारतात लवकरच लॉन्च होणार टाटाची ‘ही’ SUV कार…

टाटा मोटर्स

नवी दिल्ली: टाटा मोटर्स कंपनी लवकरच भारतात नवीन ऑफ रोड टाटा सफारी लॉन्च करण्याची तयारी झाली आहे. ही कार टाटा हॅरीअर या कारची 7- सीटर व्हर्जन असणार आहे. त्यामुळे आता २०२१ टाटा सफारी चे फोटो लीक झाले आहेत. त्याचबरोबर इतर मॉडेल चे फोटो देखील समोर आले आहेत.

उत्पादन होण्याआधी ही कार ग्रविटास या नावाने ओळखली जात होती. तर आता कंपनीने या SUV कारला सफारी या नावाने भारतात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही कार या महिन्यातच लॉन्च केली जाणार असल्याचं बोलल जात आहे. यावेळी या गाडीचा व्हीलबेस 70 मिमी इतका वाढवण्यात आला आहे.

यामध्ये SUV सोबतच सिग्नेचर स्टाइलचा ओक ब्राउन डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील, 8.8-इंच इंफोटेनमेंट सिस्टम सोबत एप्पल कारप्ले आणि एंड्रॉइड ऑटो, आवाज ओळखणारे इंस्ट्रूमेंट 7-इंचचा इंस्ट्रुमेंट पैनल, प्रिमियम बैनेकी-केलिको ओक ब्राउन लेदर सीट अपहोल्स्ट्री, जेबीएल स्पीकर्स आणि असेच अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. टाटा मोटर्सच्या आगामी 7-सीटर सफारी SUV प्रमाणेच समान ह्यूमैनिटी लाइन ग्रिल यामध्ये देखील आहे. जी पातळ एलईडी डेटाइम रनिंग लाइट्सने वेढलेली आहे. तर मोठ्या आकाराचे हेडलाईन्स प्रोजेक्टर लाइट्स देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे आता भारतात कार कधी लाँच होणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या