‘टाटा हॅरियर’ची होणार दिमाखदार एन्ट्री

blank

टीम महाराष्ट्र देशा : नुकतचं टाटा मोटर्सनं H5X या एसयूव्ही प्रकारात नव्या स्पोर्ट् कारच्या नावाचा खुलासा केला आहे. या कारचं नामकरण ‘Tata Harrier’ आहे. कंपनीनं ही कार जॅग्वार लँड रोव्हरच्या मदतीनं तयार केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच टाटानं H5X एसयूव्ही प्रकारातील ही स्पोर्ट्स कार 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली होती.

‘Tata Harrier’ ही कार 2019 पासून रस्त्यावर धावणार आहे. टाटा मोटर्सची फ्लॅगशिप असलेली एसयूव्ही प्रकारातील ही पहिली कार ठरणार असून, टाटा नेक्सॉनच्या पुढची आवृत्ती असेल. टेक्नॉलॉजी, स्टाइल आणि परफॉर्मन्समध्ये Tata Harrier जबरदस्त असून, या कारच्या माध्यमातून टाटा मोटर्ससाठी फ्युचर जेनरेशन मॉडल्सची झलकही पाहायला मिळणार आहे. Tata Harrier कारमध्ये ‘इम्पॅक्ट डिझाइन 2.0’च्या थीमचा वापर करण्यात आला आहे. Tata Harrier ही एसयूव्ही प्रकारातील कार ओमेगा मोनोकॉकच्या तुलनेत जबरदस्त ठरणार आहे.

या कारला Jaguar Land Rover (JLR) सोबत मिळून बनवण्यात आली आहे. त्यामुळे Tata Harrier ही कार कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकते. भारतात ही कार Hyundai Creta, Renault Captur, Jeep Compass ला टक्कर देणार आहे. Tata Harrier मध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांत उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये 2.0 लीटरचं डिझेल इंजिन जीप कंपसच्या स्वरूपात देण्यात येऊ शकतं. खरं तर गरिबांची कार म्हणून ओळख असलेल्या टाटा मोटर्ससाठी ही कार गेमचेंजर ठरू शकते.

कर्णधार मिताली राज मिळणार बीएमडब्लू कार गिफ्ट

भारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला मागे टाकत भारत सहाव्या स्थानी