Resomo: टाटाची पहिली ‘रेसमो’ स्पोर्ट्स कार

टाटा मोटर्सने नव्यानेच स्थापन केलेल्या ‘टामो’ या आपल्या सब-ब्रँडच्या माध्यमातून ‘रेसमो’ ही पहिली वाहिली रेसिंग कार सादर केली आहे. जिनिव्हा येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल मोटर शो 2017 मध्ये टाटा मोटर्सने आपली ‘रेसमो’ ची झलक दाखविली आहे. कंपनीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर या कारचे काही फोटोही शेअर केले आहेत. ही नवीन रेसिंग कार 2018 मध्ये बाजारपेठेत दाखल होईल असा अंदाज आहे.
‘रेसमो’ चे फिचर : 
 ही पेट्रोल इंजिन असलेली कार आहे.
 100 किलोमीटर प्रति तासाचा स्पीड ही कार फक्त 6 सेकंदांमध्ये पिकअप करते.
 या स्पोर्ट्स कारमध्ये अॅन्टी ब्रेकिंग सिस्टम आणि ईबीडी फिचर्स देण्यात आले आहेत सोबतच या कारमध्ये एअर बॅग्सचाही समावेश आहे.
 ‘मल्टी मटेरियल सँडविच’ म्हणजेच ‘एमएमएस’ या तंत्रज्ञानावर आधारित असणार्‍या फ्रेमवर्कनुसार या मॉडेलचे डिझाईन करण्यात आले आहे.
 या कारची किंमत जवळपास 25 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.