ट्विट डिलीट करत तस्लिमा नसरीन यांच स्पष्टीकरण

मोईन अली

ढाका: नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या बांगलादेशच्या बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक ट्विट करत वादग्रस्त विधान केलं होत. यावरून त्यांच्या वर टीका होत आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार मोईन अली हा ‘जर मोईन अली क्रिकेटमध्ये नसता, तर नक्कीच सिरीयाला जाऊन आयसिसला जॉईन झाला असता’ असं ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे.

मात्र क्रिकेट चाहत्यांकडून तसेच क्रिकेट विश्वातून टीका झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट करत यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे. यामध्ये त्यांनी, ‘माझ्या मोईन अली संदर्भातील ट्विट व्यंग्यात्मक आहे हे हेटर्सना चांगलेच ठाऊक आहे. परंतु त्यांनी मला अपमानित करण्याचा मुद्दा बनविला कारण मी मुस्लिम समाज सेक्युलर करण्याचा प्रयत्न करते आणि मी इस्लामिक धर्मांधतेला विरोध करते. मानवजातीची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे महिला समर्थक डावे लोक-विरोधी इस्लामवाद्यांचे समर्थन करतात.’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या