छत्तीसगडमध्ये पुन्ह एकदा नक्षली हल्ला, हल्यात दोन जवान शहीद

naxal attack at sukma

सुकमा (छत्तीसगड) : सीमेवर पाकिस्तान कडून होणाऱ्या हल्ल्यात जवान शहीद होत असताना आता नक्षली हल्ल्यात आणखी दोन जवानांना आपले प्राण गमवावा लागला आहे .सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरातील टुंडामारका जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यात एसटीएफचे (स्पेशल टास्क फोर्स) दोन जवान शहीद झाले.

सुकुमातील चिंतागुफा परिसरातील टुंडामरका जंगलात सीआरपीएफ आणि पोलिसांचं नक्षलावादाचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरु आहे. याच ऑपरेशनअंतर्गत जवान पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी एसटीएफच्या जवानांवर हल्ला केला. पेट्रोलिंगसाठी जात असलेल्या सुरक्षा दलावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. सुरक्षा दलाने देखील या हल्ल्याच जोरदार प्रत्युत्तर देत 12 ते 15 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचं समजते असून डीआयजी पी. सुंदर राज यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले. जखमी जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत.  काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमधील बस्तरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात नक्षलवाद्यांच्या कंपनी नंबर-6 च्या सेक्शन कमांडरचा पोलिसांनी खात्मा केला होता. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांची संख्या वाढत असून सरकार नक्षलवादविरोधात कठोर भूमिका का घेत नाही ?असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.