राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांचा पक्षाला रामराम

पवारांच्या ‘राफेल’वरून राष्ट्रवादीमध्ये यादवी

महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याने विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे यावरून आता राष्ट्रवादीमध्ये यादवी सुरु झाल्याच दिसत आहे, पक्षाचे संस्थापक सदस्य असणारे खा. तारिक अन्वर यांनी तडकाफडकी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे, तसेच पक्षाला देखील सोडचिट्ठी दिली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी राफेल खरेदीची संसदीय समितीच्या वतीने चौकशीची मागणी करतानाच, मोदी सरकारचा बचाव देखील केला होता. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या, आता यावरूनच खुद्द राष्ट्रवादीमध्येच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दरम्यान, तारिक अन्वर यांच्नी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने उत्तर भारतामध्ये पक्षाची पीछेहाट होवू शकते.

You might also like
Comments
Loading...