‘ते’ विधान जर चुकीचं होतं तर मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं : तारिक अन्वर

नवी दिल्ली- राफेल डीलमध्ये पवारांनी मोदींची बाजू घेतली आहे. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर म्हणाले आहेत. राफेल डील संदर्भातील पवार साहेबांचं विधान अनेक तास मीडियामध्ये व्हायरल होत होतं. परंतु पवार साहेबांनी त्यावर कोणताही खुलासा केला नाही. विधान चुकीचं होतं मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. म्हणत अन्वर यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला आहे .एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तारिक अन्वर यांनी हे विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अन्वर ?
राफेल डील संदर्भातील पवार साहेबांचं विधान अनेक तास मीडियामध्ये व्हायरल होत होतं. परंतु पवार साहेबांनी त्यावर कोणताही खुलासा केला नाही. विधान चुकीचं होतं मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. सर्व विरोधी पक्ष राफेल डीलवर एकत्र आहेत. राफेल प्रकरणात मोदींचं समर्थन करणं चुकीचं आहे. शरद पवारांबद्दल मला आदर आहे. पक्ष सोडणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही शरद पवारांनी केलेली मोठी चूक होती.

शरद पवारांच्या विधानानंतर 24 तास मी वाट पाहिली, परंतु पवार साहेबांनी कोणतंही स्पष्टीकरण न दिल्यानं मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसची विचारधारा आम्ही कधीही सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. मी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही