‘या’ पक्षात जाण्याचा पर्याय तारिक अन्वर यांच्यासाठी असेल खुला

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याने विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे यावरून आता राष्ट्रवादीमध्ये यादवी सुरु झाल्याच दिसत आहे, पक्षाचे संस्थापक सदस्य असणारे खा. तारिक अन्वर यांनी तडकाफडकी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे, तसेच पक्षाला देखील सोडचिट्ठी दिली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी राफेल खरेदीची संसदीय समितीच्या वतीने चौकशीची मागणी करतानाच, मोदी सरकारचा बचाव देखील केला होता. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या, आता यावरूनच खुद्द राष्ट्रवादीमध्येच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दरम्यान, तारिक अन्वर यांच्नी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने उत्तर भारतामध्ये पक्षाची पीछेहाट होवू शकते.

तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसचा हात धरणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि काँग्रेस सातत्याने बिहारमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत जर तारिक अन्वर काँग्रेसमध्ये सामील झाले तर राजकीयदृष्ट्या काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

दरम्यान, तारिक अन्वर यांनी पवारांचं विधान चुकीच्या पद्धतीनं घेऊन राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची घेतलेली भूमिका बेजबाबदारपणाची आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे.

चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल : पवार

You might also like
Comments
Loading...