fbpx

नफरत से नही प्यार से जीतेंगे, व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून मोदींवर निशाना

टीम महाराष्ट्र देशा – नफरत से नही प्यार से जीतेंगे., असे म्हणत राहुल गांधी यांनी ट्वीटवरून व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून मोदींना निशाना केले आहे.तर दुसरीकडे आज राहुल यांनी अजमेर येथील राष्ट्रीय महाअधिवेशनातुन मोदींना टार्गेट केले आहे.

आम्ही प्रेमाने देश बदलायला चाललो आहे, नरेंद्र मोदी मात्र लाल किल्ल्ल्यावरून सांगतात की 70 वर्षात काहीच बदलेले नाही. स्वांतत्र्यानंतर काहीच झाले नाही ? स्वातंत्र्यानंतर काहीच बदलले नाही ? नरेंद्र मोदी असे दाखवू इच्छितात की त्यांनीच सर्वकाही केले आहे. हा केवळ कॉंग्रेसचाच अपमान नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीचा अपमान करत असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

राजस्थानमधील अजमेरमध्ये ते बोलत होते. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांचे स्वागत केले.