देवेंद्र फडणवीसांविरोधात जळगावात शिवसैनिकांकडून ‘टरबूज फोडो’ आंदोलन

जळगाव : मुंबईतील आझाद मैदानावर एका आंदोलनच्या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने बांगड्या भरल्या आहेत’असे वक्तव्य केले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याविरोधात जळगाव महानगर शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून टरबूज फोडो आंदोलन केले.

जळगाव येथील टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या विरोधात घोषणाही दिल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या शोभा चौधरी आदींची उपस्थिती होती.

Loading...

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली होती. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली. बांगड्या घालणारे हात कर्तृत्ववान आहेत हे जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले तसेच अनेक महिलांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे बांगड्या घालणाऱ्या हाताची तुलना करू नका असे आवाहन विद्या चव्हाण यांनी केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती