मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या मालिकेतील एक महत्वाचा अभिनेता तब्बल १४ वर्षानंतर मालिका सोडून जाणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांना या मालिके संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्यायचे असते. या मालिकेचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मुख्य अभिनेता शैलेश लोढा तब्बल १४ वर्षानंतर मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. शैलेश लोढा याने शुटींग देखील थांबवल्याची बातमी समोर आली आहे.
दयाबेन नंतर आता तारक मेहताच्या निरोपाची ही बातमी समजताच, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसणार आहे. आत्तापर्यंत लोक दयाबेनची वाट पाहत होते, पण आता या मालिकेचा कणा समजला जाणारा शैलेश लोढा मालिका सोडून जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.
शैलेशने थांबवले शूटींग-
रिपोर्टनुसार, शैलेश लोढाने गेल्या एक महिन्यापासून मालिकेचे शुटींग थांबवले आहे. शैलेश लोढा म्हणतात की, या मालिकेमध्ये काम करत असताना मी काही चांगल्या ऑफर्सही नाकारल्या. मालिकेचे निर्मातेही त्यांच्या तारखांचा योग्य वापर करू शकत नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :