पुतळ्यांची विटंबना करण्याचं लोण महाराष्ट्रात; सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा प्रयत्न

savarkar statue aurangabad

औरंगाबाद: पुतळ्यांची विटंबना करण्याचे निंदनीय प्रकार सुरूच असून औरंगाबादमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. आज सकाळी समर्थनगर भागात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. ही बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिवसैनिक,हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी जनता संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरली आहे.

savarkar statue aurangabad hindutvaस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं कळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल,विधानसभा संघटक राजू वैद्य, नगरसेवक सचिन खैरे,माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी, भाजपचे आमदार अतुल सावे, विहींपचे शैलेश पत्की, हिंदुत्ववादी संघटना आदींनी तातडीन समर्थनगर भागाकडे धाव घेतली. तीन दिवसांच्या आत आरोपीला अटक करा अन्यथा शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसांची जबाबदारी असेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

savarkar statue aurangabad hindutva sanghtan warn

सध्या याठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, अनिल आडे यांच्यासह मोठा फौज फाटा याठिकाणी आहे.शहरातील डीसीपी ऑफिस समोरच हा प्रकार करण्यात आला. तीन महिन्यात तिसऱ्यांदा शहर अशांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी त्रिपुरामध्ये दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला होता.

लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद तामिळनाडूनंतर पश्चिम बंगालमध्येही उमटले. कोलकातामधील कालीघाट परिसरात जनसंघांचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं.इतकंच नाही तर हा पुतळा उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला.तामिळनाडूतही ई.व्ही रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. तामिळनाडूच्या वेल्लोर तालुक्यात ही घटना घडली.

mahatma gandhi brokan
गुरुवारी केरळमध्ये अज्ञात व्यक्तींनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. अज्ञातांनी गांधींजीच्या पुतळ्यावरील चष्मा तोडला असून या प्रकरणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पुतळ्यांची तोडफोड करण्याचं लोण उत्तर प्रदेशातही पोचलं असून मीरत येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचं समोर आलं होत. पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला तत्काळ अटक करा अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.