वडिलांच्या निधनानंतर टप्पूने शेअर केली भावनिक पोस्ट ; सोनू सूदचे देखील मानले आभार

सोनू सूद

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा छोटा अभिनेता भव्य गांधी याच्याही वडिलांचं करोना व्हायरसमुळे निधन झालं आहे. वडिलांच्या निधनानं भव्य आणि त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भव्य गांधी याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेरच्या काही दिवसांत त्यांची तब्येत ढासळल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र ते करोनाच्या या लढाईत ते हारले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात भव्यचे वडिल विनोद गांधी यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, आपल्या वडिलांच्या निधनानंतर भव्यने त्यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने बॉलिवूड अभिनेता ‘सोनू सूद’ आणि उपचारासाठी मदत केलेल्या डॉक्टरांचे देखील आभार मानले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP