विनयभंग प्रकरणातील साक्षीदाराला धमक्या दिल्या जात आहेत : तनुश्री दत्ता

टीम महाराष्ट्र देशा- अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यात सुरु असलेल्या वादाला आता नवं वळण मिळालं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळप्रकरणी नाना पाटेकरांना क्लीन चिट मिळाल्याच्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत होत्या. मात्र, त्या अफवा असून या प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लिनचिट मिळालेली नाही, असे ओशिवरा पोलिसांनी सांगितले.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी त्यावेळी उपस्थित असणाऱ्या १५ साक्षीदारांची चौकशी केली होती.दरम्यान,माझ्या बाबतीत घडलेल्या विनयभंग प्रकरणातील साक्षीदाराला धमक्या देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप तनुश्रीने केला आहे.

या प्रकारांमुळे साक्षीदार दडपणाखाली असून पोलिसांना त्याबाबत माहिती दिल्याचे तनुश्रीचे वकील अ‍ॅड्. नितीन सातपुते यांनी सांगितले. तसेच आरोपी आणि निवडक साक्षीदारांच्या नार्को अ‍ॅनालीसीस, लाय डिटेक्टर चाचण्या केल्यास सत्य उजेडात येऊ शकेल, असेही अ‍ॅड. सातपुते यांनी सांगितले. त्यासाठी आपण यापुर्वीच पोलीस ठाण्यात अर्ज केल्याचे ते म्हणाले.Loading…
Loading...