नाना पाटेकरांना क्लीन चीट ही अफवा

टीम महाराष्ट्र देशा- अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यात सुरु असलेल्या वादाला आता नवं वळण मिळालं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळप्रकरणी नाना पाटेकरांना क्लीन चिट मिळाल्याच्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत होत्या. मात्र, त्या अफवा असून या प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लिनचिट मिळालेली नाही, असे ओशिवरा पोलिसांनी सांगितले.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी त्यावेळी उपस्थित असणाऱ्या १५ साक्षीदारांची चौकशी केली होती.

पोलिसांचा तपास सुरू असतानाच आज नाना पाटेकरांना क्लीन चिटच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या प्रकरणात कोणालाही क्लीन चिट दिली नसल्याचे परिमंडळ 9चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांनी सांगितले.