fbpx

नाना पाटेकरांच्या क्लीनचिटवर तनुश्री दत्ताची संतप्त प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरोधात # me too अंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप करत ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावर आता ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी अहवाल सादर केला आहे. मात्र या अहवालानुसार नाना पाटेकर यांच्याविरोधात असणारे पुरावे हे कमकुवत असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. तर नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाल्याने तनुश्री दत्तने प्रतिक्रिया दिली आहे.

तनुश्री दत्ता म्हणाली की, भ्रष्ट पोलीस दल आणि न्यायव्यस्थेमुळे एका सर्वात भ्रष्ट माणून नाना पाटेकर यांना क्लीनचिट मिळाली. ज्यांच्या नावावर इंडस्ट्रीमधील अनेक महिलांना धमकावल्याचा, घाबरवण्याचा आणि छळ करण्याचा यापूर्वीही आरोप झाला आहे, अशी प्रतिक्रिया तनुश्रीने दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

 

दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली होती. त्यानंतर ती परदेशात वास्तव्यास गेली होती. गेल्या वर्षी ती परदेशातून भारतात आली. त्यानंतर तिने #MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.