बोर्ड मिटींग नंतर कामगारांचा प्रचंड प्रतिसाद

राहुरी : डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या कायम व सिजनल कामगारांना 1 ऑगस्ट रोजी नियमित कामावर हजर करून घेऊ असे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने 31 जुलै रोजी झालेल्या कारखाना बोर्ड मिटींग नंतर कामगारांना आवाहन करण्यात आले होते.याच आवाहनाला डॉ .तनपुरे च्या कामगारांनी शंभर टक्के प्रतिसाद दील्याचे चित्र कारखाना गेटवरील प्रांगणात दिसून आले.


डॉ.तनपुरे चा चालु वर्षीचा गाळप हंगाम सुरू करणार असे आवाहन या अगोदर डॉ.सुजय विखे व त्यांचे संचालक मंड़ळ यांनी शेतकरी , सभासद व कामगार यांना दिलेच होते. कामगार सकाळी कामावर हजर होताच प्रथम डॉ.तनपुरे कारखाना गेट वरील दरवाजा जवळ कामगार एकत्रीत येउन त्यांनी पुजन केले.

कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदीरात जाउन तेथेही कामागारांनी दर्शन घेतले व आमच्या कामधेनुला संकटापासुन वाचविले त्याबद्दल भावनात्मक होउन प्रार्थना देखील केली.कारखान्याचे कामगार यांनी कारखाना परिसरात प्रवेश करताच एक छोटेखानी कामगार सभा घेण्यात आली .सभेत डॉ.तनपुरे कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी कामगारांना उद्देशुन सांगीतले की ,आपल्याला हा कारखाना येत्या 1 नोव्हेंबर च्या आसपास चालुच करून दाखवायचा आहे.तालुक्यातील सर्वच शेतक-यांनी या कारखान्यास ऊस देण्याचे सहकार्य करावे.तीन महीन्यांमधे संपूर्ण ऑफ सिजनचे कामे अद्यावत करावयाचे आहे.कारखाना सुरू झाला की , त्वरीत कामगारांचे पगार करण्यात येणार आहे.प्रवरा कारखाना व डॉ.तनपुरे कारखाना यांचा पगार सारख्याच तारखेला करण्याचा मानस आहे.आपण सर्वानी मिळुन कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करणे क्रमप्राप्त आहे.कामगार कृती समीतीचे सुरेश थोरात पुढे म्हणाले की, आज ख-या अर्थाने सोनियाचा दीवस आहे.शेतकरी ,कामगार ,सभासद यांचे मागील तीन वर्षापासून धुराड़ी बंद असल्याने अतोनात हाल झाले होते. डॉ .सुजय विखे ,राहुरीचे आ.शिवाजीराव कर्ड़ीले, डॉ.तनपुरे चे अध्यक्ष व संचालक मंड़ळ ,तसेच जिल्हा सहकारी बॅकेने सहकाऱ्याची भावना दाखवित या तालुक्याला पुन्हा एक नवे गतवैभव मिळविण्यास ताकद दीली आहे.सुख सुखसमाधानाचे वातावरण तयार झाले आहे.सेवानिवृत्त कर्मचारी यावेळी मोठ्या संखेने हजर होते. या छोटेखानी सभेत प्रामुख्याने कारखानाचे कामगार अर्जुन दुशिंग,सचिन काळे,कारभारी खुळे,सिताराम नालकर,रफिक सय्यद, सुधीर आहेर,दिलीप कोहकड़े,गजानन निमसे,महिला कामगार सौ.सुनिता राउत,संगीता गोल्हार,सविता ठुबे आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांना कारखान्याच्या कोणत्याही विषयासंदर्भात अलिप्त न ठेवता संपूर्ण विश्वासात घेतले जाणार आहे.कोणीही अफवांवर विश्वास ठेउ नये.कामगार समती पत्रक बद्दल कोणतीही अफवा पसरवू नये
ज्ञानदेव आहेर (अध्यक्ष )डॉ.तनपुरे कामगार युनियन