तन्मय फडणवीस ‘हेल्थकेअर वर्कर’ म्हणून लस दिली, RTI मधून धक्कादायक माहिती समोर

tanmay fadnavis

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नियमात बसत नसताना देखील कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती, त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर तन्मय हा त्यांचा दूरचा नातेवाईक असल्याचे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढवली होती.

आता पुन्हा एकदा या प्रकरणात माहिती अधिकारातून नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील सेव्हनहिल हॉस्पिटलमध्ये लस घेताना तन्मय फडणवीस यांची नोंदणी ‘हेल्थकेअर वर्कर’ ( आरोग्य कर्मचारी ) अशी होती. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती अधिकार कायद्यातून माहिती मागवली होती. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

fadnvis RTI 1

fadnavis RTI 2

fadnavis RTI 3

इन्स्टाग्राम अकाऊंटवर तन्मय यांनी आपली ओळख पब्लिक फिगर अशी केली आहे, तर ट्वीटवर त्यांनी आपण अभिनेता असल्याचं म्हटलं आहे. मग असे असताना तन्मय फडणवीस हेल्थकेअर वर्कर’ कसे ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

दरम्यान, तन्मय यांच्या ट्विटर अकौंटवर पाहीले तर त्यांनी अभिनेता असल्याचे नमुद केले असुन काही मालिकांमध्ये त्यांनी प्रत्यक्षात भुमिकाही साकारली आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांनी उल्लेख केला असल्याची माहिती मला माहीती अधिकारात प्राप्त झाली आहे. एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लसीचा तुडवडा असताना अशा पद्धतीने लस घेणे कितपत योग्य आहे हा मोठा प्रश्न या निमित्ताने पडतो. अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी दिली आहे.

तर, वेळोवेळी नैतिकतेच्या व नियमांच्या गप्पा मारणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता तन्मय फडणवीस यांना आपले पुतणे, अभिनेते की हेल्थकेअर वर्कर म्हणुन लस देण्यात आली याबद्दल नेमके खर सांगु शकतील. असा टोला देखील नितीन यादव यांनी लगावला आहे.

काय होता वाद 

ज्यावेळी कोरोना लसीकरण करण्यासाठी ४५ वर्ष वयाची अट होती त्यावेळी तन्मय फडणवीस यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तन्मय फडणवीस यांचे वय 45 वर्षांहून कमी आहे तसंच ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत. तेव्हा त्यांना लस कशी घेता आली? असा प्रश्न विचारला जात होता.

कोण आहेत तन्मय फडणवीस ?

तन्मय फडणवीस हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत. माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे पुत्र अभिजीत फडणवीस यांचा तन्मय हा मुलगा आहे. शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तन्मय यांनी आपली ओळख पब्लिक फिगर अशी केली आहे, तर ट्वीटवर त्यांनी आपण अभिनेता असल्याचं म्हटलं आहे.

कॉंग्रेसने केले होते आरोप

45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? अशी टीका काँग्रेसने त्यावेळी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

IMP