‘छपाक’ला मागे टाकत ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ची छप्परफाड कमाई

blank

टीम महाराष्ट्र देशा : बॉक्सऑफिसवर १० जानेवारीला एकत्रच दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. अजय देवगनचा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ आणि दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ . चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉक्सऑफिसवर हे दोनही चित्रपट एकमेकांना चांगलीच टक्कर देणार असल्याचं बोललं जात होतं. पण दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर अजयच्या ‘तानाजी…’ने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत ‘छपाकवर मात केली आहे.

‘बॉक्सऑफिस इंडिया’नुसार, ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ने ओपनिंग डेलाच जवळपास १५.१० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी हा ‘तानाजी…’ने जवळपास २०.५७ कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच बॉक्सऑफिसवर ‘तानाजी…’ने दोन दिवसांत जवळपास ३५.६७ कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (छपाक बॉक्स ऑफिस कलेक्शन) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दीपिकाचया छपाकनं पहिल्या दिवशी 4.77 कोटींची कमाई केली होती. तर, दुसर्या दिवशी चित्रपटानं तब्बल 30-40 टक्के वाढ करत 6 कोटींच्यावर कमाई केली आहे. त्यानुसार दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाने दोन दिवसांत सुमारे 11 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने या चित्रपटाच्या कमाईची माहिती दिली आहे.

‘तान्हाजी’ हा सिनेमा मराठमोळा दिग्दर्शित ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगणच्या करियरमधील हा शंभरावा सिनेमा आहे. ट्रेड अनालिस्ट तरन आदर्श यांनी ट्विट करुन दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे दिले.

तान्हाजी हा सिनेमा एकूण 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. यामध्ये भारतात 3880 तर परदेशात 660 स्क्रीन्सचा समावेश आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत 2D आणि 3D मध्ये रिलीज झाला आहे.दुसरीकडे छपाक हा भारतात 1700 तर परदेशात 460 अशा एकूण 2160 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.