तानाजी सावंतांच्या रुपाने माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद,शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई : बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे, मलबारहिल येथील राजभवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे. यामध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे २ आणि आरपीआयला एक मंत्रीपद मिळाले आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदावर नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषद आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्या रुपाने माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवासी आहेत. तानाजी सावंत यांच्या शपथविधीनंतर माढा तालुक्यात फटाक्यांच्या आतशबाजीसह मोठ्याप्रमाणात जल्लोष करण्यात आला. शिवसैनिक शहरात ठिकठिकाणी जल्लोष करत आहे.

Loading...

माढ्याचे तानाजी सावंत हे यवतमाळ वाशीममधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी