fbpx

जर कोणाला सत्तेचा माज असेल, तो उतरवण्याची हिंमत शिवबंधनात : तानाजी सावंत

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या भाजप-सेना युतीचे सरकार आहे. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर दोनही पक्षातील नेते दावा करत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते आणि जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भूम परांडा वाशी रहिवाशांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सावंत यांनी ‘आज प्रत्येक क्षणाला सावध राहण्याची गरज आहे. आम्ही गाफिल नाही. जर कोणाला या सत्तेचा किंवा कोणत्या गोष्टीचा माज असेल, तो माज उतरवण्याची हिंमत सुद्धा आमच्या शिवबंधनात आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडायचं नाही,असा इशारा भाजपला दिला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ‘एकला चलो रे अथवा युती ठेवायची की नाही हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील’ तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच नव्हे पंतप्रधान झालेलं ही मला आवडेल. पण हा निर्णय स्वतः पक्षप्रमुख घेतील असंही विधान सावंता यांनी केलं.