तमिमच्या शतकामुळे अखेरच्या सामन्यात बांग्लादेशचा झिंबाब्वेवर ५ गडी राखुन विजय

मुंबई : झिंबाब्वे दौऱ्यावर असलेल्या बांग्लादेश संघाने अखेरच्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखुन पराभव केला. झिंबाब्वेने दिलेल्या २९८ धावांचे लक्ष्य ५ गडी गमावत सहज पार केले. यासह बांग्लादेशने झिंबाब्वेला ३-० असा व्हाइट वॉश दिला.

अखेरच्या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेने सर्वबाद २९८ धावांची मजल मारली. सलामीवीर रेगिस चकबवाने झिंबाब्वेकडून ९१ चेंडुत ७ चौकार आणि १ षटकारासंह ८४ धावांची सर्वाधीक अर्धशतकी खेळी केली. बांग्लादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्तफिजुर रहमान दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात बांग्लादेशने ४८व्या षटकात ५ गडी गमावत हे आव्हान सहज पार केले. यासंह बांग्लादेशने झिंबाब्वेचा ५ गडी राखुन पराभव करत मालिका ३-० अशी आपल्या नावे केली. कर्णधार आणि सलामीवीर तमिम इक्बालने ९७ चेंडुत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ११२ धावांची शतकी खेळी केली. झिंबाब्वेकडून डोनाल्ड तिरिपानो आणि वेस्ले मधेव्हरे दोघांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. शतकीय खेळीसाठी तमिम इक्बालला सामनाविर आणि शकिब अल हसनला मालिकाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP