fbpx

न्यूझीलंडमध्ये गोळीबार ; हा फारच भीतीदायक अनुभव होता – तमीम इक्बाल

वेलिंग्टनः न्यूझीलंड येथील दक्षिणेकडील क्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदीत मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४०  जण ठार झाले असून २० जखमी झाले आहेत. न्यूझीलंड पोलिसांनी ४  जणांना ताब्यात असून, त्यात १  महिला तर ३  पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान,बांग्लादेश क्रिकेट  टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. गोळीबारात पूर्ण बांग्लादेशची  टीम थोडक्यात बचावली आहे. घटनास्थळी बांग्लादेशच्या क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते.

 

हा फारच भीतीदायक अनुभव असल्याचं क्रिकेटर तमीम इक्बालनं सांगितलं आहे. खेळाडू बसमधून उतरून मशिदीत जाणार होते, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होते तेव्हा हा गोळीबार करण्यात आला, अशी माहिती बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिली.

2 Comments

Click here to post a comment