fbpx

रजनीच्या राजकीय कारकिर्दीवर केशरी रंगाचा जास्त प्रभाव ; कमल हसनची रजनीकांतवर टीका

Kamal-and-Rajini

टीम महाराष्ट्र देशा: रजनीच्या राजकीय कारकिर्दीवर केशरी रंगाचा जास्त प्रभाव दिसून येत असून, ही परिस्थिती अशीच राहिली तर मी त्याच्यासोबत युती करणार नाही’ अस अभिनेता कमल हसन याने स्पष्ट केल आहे. रजनीकांत आणि आपल्यामध्ये खूप चांगली मैत्री असून, राजकारण आणि मैत्री या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तामिळनाडूच्या राजकीय पटलावर सध्या दोन नावं बरीच चर्चेत आली आहेत. ती नावं म्हणजे कमल हसन आणि रजनीकांत. अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या या दोन दिग्गज अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेत त्या दिशेने वाटचालही सुरु केली. रजनीकांत यांनी नव्या वर्षाचे औचित्य साधत नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या या घोषणेनंतर कमल हसनही भविष्यात त्यांच्यासोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे मात्र, कमल हसन यांच्या या वक्तव्याने कमल हसन-रजनीकांत यांच्या युतीचे स्वप्न पाहणाऱ्यांची निराशा झाली आहे असेच म्हणावे लागेल.