‘या’ राज्याच्या राज्यपालांची COVID-19 चाचणी आली पॉझिटिव्ह

corona

नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी.

दरम्यान, आजच  महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आली आहे. त्यांना आज घरी देखील सोडण्यात आले आहे. यानंतर त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याआधी अमिताभ यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे. याबद्दल त्यांचे पुत्र आणि अभिनेते अभिषेख बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोना या आजारावर मात केली असून त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.डाॕ.निलंगेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथील रुबी हाॕस्पीटलमध्ये उपचार चालू होते.

त्यांचे वय ९१ वर्ष असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी काळजी व्यक्त होत होती.डाॕ.निलंगेकर यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी देवाला अभिषेक करुन साकडे घातले.त्याचबरोबर ते आजारावर मात करावे यासाठी सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.आपल्या लाडक्या नेत्याचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह यावा यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात

IMP