जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश

Jayalalithaa

चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांनी दिले आहेत. माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या मृत्यूच्या कारणांवर प्रश्न उपस्थित करून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होता. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी चौकशीची तयारी दर्शवली असून निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. याशिवाय जयललिता यांच्या पोएस गार्डन या निवासस्थानाचे रुपांतरण स्मारकात करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे