तामिळनाडूत आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरु असून, स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन करण्यात येतय. कंपनीच्या विस्ताराचं वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चाललं आहे. या आंदोलनाला काल अचानक हिंसक वळण लागलं, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ जणांना आपला जीव गमवावा लागल्याच वृत्त आहे.

bagdure

पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राजकारण तापलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील राज्य सरकारवर टीका केली. पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू होणं हे राज्य पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे, असं ट्वीट त्यांनी केलं. तर तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन चिंता व्यक्त केलीये.

You might also like
Comments
Loading...