आधी पवारांसोबत प्रवास आता चंद्रकांतदादा-उदयनराजेंचा एकत्र प्रवास

Udayanraje_Bhosale

टीम महाराष्ट्र देशा- महाबळेश्वर सातारा धामणेर रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाआधी चंद्रकांत पाटील आणि खा.उदयनराजे भोसले एकाच गाडीत गेल्यामुळे ते भाजपाप्रवेश कधी करणार याची दिवसभर चर्चा साताऱ्यात पुन्हा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, उदयनराजे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती, तेव्हापासूनच ते भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे काल सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर होते. याच पार्श्वभूमीवर, चंद्रकात पाटील यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची शासकीय विश्रामगृह सातारा येथे सकाळी भेट घेवून चर्चा केली. साताऱ्यात आलेल्या महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाडीत कराड पासून सातारापर्यंत खा. उदयनराजेंनी प्रवास केल्यामुळे पुन्हा एकदा खा. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. यावेळी, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपा नेते अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनिल काटकर, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भोसलेंनी एकत्र प्रवास केला होता.आधी पवारांसोबत प्रवास आता चंद्रकांतदादा-उदयनराजेंचा सोबत प्रवास केल्याने पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

चंद्रकांतदादांचे कौतुकच वाटते ! – जयंत पाटील

उदयनराजे-पंकजा मुंडे भेट,भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण